नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोह्यात सुनील द. तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी व IESP संस्थेचा लोकार्पण सोहळा संपन्न – आजचा महाराष्ट्र

रोह्यात सुनील द. तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी व IESP संस्थेचा लोकार्पण सोहळा संपन्न

प्रतिनिधी महेश स्वामी जंगम 

रायगड (रोहा) :- वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, रोहा व द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या सुनील द. तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी, रोहा व IESP संस्थेचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि. १५ मार्च २०२६) उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम प.पू. पांडुरंग शास्त्री आठवले संकुल, रोहा येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे लोकार्पण मा.श्री.सुनील तटकरे ,

खासदार तथा नॅशनल ऑइल अँड गॅस नियामक मंडळाचे चेअरमन यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अदिती तटकरे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री उपस्थित होत्या.यावेळी सौ. वरदा सुनील तटकरे, मधुकर पाटील (उपाध्यक्ष रा.जी.प.), सौ. विजया पाशिलकर (सभापती पं.स.), वनश्री शेडगे (नगराध्यक्ष), संजय मांडलुस्कर (उपसभापती पं.स. रोहा), अहमद दर्जी (उपनगराध्यक्ष), अजय ऐडके (मुख्याधिकारी) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच द युनिक अकॅडमीचे संचालक मल्हार पाटील व तुकाराम जाधव तसेच IESP चे सीईओ गुरुप्रीत खन्ना यांनी संस्थेच्या कार्याबाबत माहिती देत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे आयोजन वरदाई चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अनिकेत सुनील तटकरे व वेदांती अनिकेत तटकरे यांनी केले होते. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]