नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सह्याद्री प्रबोधन संस्था भिवंडी तर्फे महिला सन्मान समारंभ मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न! – आजचा महाराष्ट्र

सह्याद्री प्रबोधन संस्था भिवंडी तर्फे महिला सन्मान समारंभ मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!

प्रतिनिधी

ठाणे ( भिवंडी ):- जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी चे औचित्य साधून दि.१० मार्च २०२६ रोजी सह्याद्री प्रबोधन संस्थेच्या पुढाकाराने सह्याद्री पतसंस्था,श्री सखी महिला पतसंस्था, राजमाता महिला पतसंस्था भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या महिला सन्मान समारंभात अनेक कर्तबगार हरहुन्नरी महिलांचा मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित गौरव करण्यात आला.तसेच सदर

प्रसंगी महिलांचे आरोग्य: समस्या व उपाय या विषयावर कृतिका पाटील, डॉ.धनश्री थळे व डॉ.हर्षदा मुकादम या महिला रोग तज्ञांनी उपस्थित महिला-भगिनींना आरोग्यविषयक माहितीपर मार्गदर्शन केले.सह्याद्री प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष श्री विश्वास थळे,कार्याध्यक्ष डॉ.प्रमोद पाटील,उपाध्यक्ष डॉ.अरूण पाटील, संचालिका सौ.रंजना मुकादम,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय पाटील, शाखाधिकारी सौ.संगिता किशोर पाटील, सौ.अनिता ताटे यांच्या सह अनेक मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष डॉ.प्रमोद पाटील व संचालिका सौ.रंजना मुकादम यांनी केलेल्या नियोजनासाठी सर्व संस्थांच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे मौलिक सहकार्य लाभले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]