नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुशेडे गावची कन्या अंजिता मोरे महाराष्ट्र सुरक्षा बलात भरती; गावासाठी अभिमानाचा क्षण – आजचा महाराष्ट्र

कुशेडे गावची कन्या अंजिता मोरे महाराष्ट्र सुरक्षा बलात भरती; गावासाठी अभिमानाचा क्षण

प्रतिनिधी दिलीप करकरे 

रायगड (माणगाव) :- कुशेडे गावातील कु. अंजिता बळीराम मोरे हिने महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये भरती होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. कुशेडे गावातून महाराष्ट्र सुरक्षा बलात भरती होणारी ती पहिली मुलगी ठरली असून तिच्या या यशामुळे गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.अंजिता मोरे हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील मुलींनाही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करता येतात, याचे उत्तम उदाहरण अंजिताने घालून

दिले आहे. तिच्या या यशामुळे गावातील इतर मुलींनाही नवी प्रेरणा मिळणार असून शिक्षण व करिअरच्या वाटेवर पुढे जाण्याची उमेद निर्माण झाली आहे.अंजिताच्या या यशामागे तिच्या कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. आई सौ. सुवर्णा बळीराम मोरे, वडील श्री. बळीराम गंगाराम मोरे तसेच भाऊ अनेश बळीराम मोरे यांनी तिच्या शिक्षणापासून ते भरतीच्या तयारीपर्यंत सातत्याने साथ दिली. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच अंजिता आत्मविश्वासाने या स्पर्धेत उतरली आणि यश मिळवले.अंजिताच्या या यशामुळे कुशेडे गावाचे नाव संपूर्ण परिसरात उज्ज्वल झाले असून ग्रामस्थांकडून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी तिच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केले तसेच तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र सुरक्षा बलात सेवा देताना अंजिताने प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत समाज आणि देशासाठी काम करावे, तसेच तिची कारकीर्द अधिकाधिक यशस्वी व्हावी, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]