माणगाव तालुक्यात महिला दिन उत्साहात साजरा; कर्तृत्ववान महिलांचा गौरव
प्रतिनिधी दिलीप करकरे
रायगड (माणगाव) :- माणगाव तालुक्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे मत सौ. रचना निलेश थोरे यांनी व्यक्त केले. माणगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरी नीलकंठ खडतर, माणगाव पोलीस दलातील कर्तव्यदक्ष सहाय्यक 
निरीक्षक सौ. विमल ठाकूर, साई विभागातील पत्रकार सौ. सपना साळुंखे, ज्येष्ठ आशासेविका सौ. उषाताई दळवी, अंगणवाडी सेविका व समाजसेविका सौ. गुलाब लक्ष्मण खडतर तसेच दिव्यांग बांधवांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सौ. पूजा प्रशांत लहाने यांचा कर्तृत्ववान महिला म्हणून गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना महिला सुरक्षा कायदे, संकटकाळात घ्यावयाची काळजी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सायबर क्राईम, पोस्को कायदा, कौटुंबिक हिंसाचार, POSH Act 2013, कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार, पोलीस दिदी, सखी केंद्र, भरोसा सेल (महिला विभाग रायगड पोलीस), दामिनी पथक तसेच ११२ या आपत्कालीन क्रमांकावरील तात्काळ मदतीविषयी जिल्ह्यातील नामांकित महिला विधिज्ञ ॲड. गीता म्हात्रे यांनी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल सौ. रचना निलेश थोरे यांनी विशेष आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाला युवामोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, जिल्हा पातळीवरून सौ. जयश्री भांड, माणगाव तालुकाध्यक्ष परेशजी सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष रुपाली कासारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयन पोटले यांनी केले. तसेच तालुका सरचिटणीस रीना माने, पूजा पवार, चिटणीस दीपाली दरेकर आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.सन्मान स्वीकारताना पत्रकार सपना साळुंखे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान केवळ आमचा नसून सर्व नारीशक्तीचा आहे. या गौरवामुळे आम्हाला समाजकार्यासाठी नवचैतन्य आणि प्रेरणा मिळेल.”या कार्यक्रमासाठी सौ. रीना देवजी माने, रसिका राजेंद्र कळंबे, शुभांगी सुधीर म्हामुणकर, दीपाली दिलीप दरेकर, शीतल बक्कम, मंजुला लहाने, युवा सामाजिक कार्यकर्ते राम जाधव, उद्योजक प्रमोद खडतर, पेण गाव अध्यक्ष देवजी माने, कृष्णा मोंडे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













