नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड जिल्हा परिषदेला नवे नेतृत्व – आजचा महाराष्ट्र

रायगड जिल्हा परिषदेला नवे नेतृत्व

प्रतिनिधी

रायगड :- रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मा. श्री. मंगेश वाकडीकर यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी मा.श्री. मधुकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.नवनिर्वाचित

अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.उपाध्यक्ष मधुकर पाटील पाटील यांनीही सर्व सदस्यांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]