नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जागतिक महिला दिनानिमित्त सेवा गौरव पुरस्काराने सामाजिक कार्याचा सन्मान! – आजचा महाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त सेवा गौरव पुरस्काराने सामाजिक कार्याचा सन्मान!

प्रतिनिधी

ठाणे:- फांगणे येथील कै. मोतीराम गणपत दलाल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जगातील पहिली आजीबाई शाळा यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि गरजू घटकांसाठी सातत्याने केलेल्या सेवाकार्याची दखल घेत हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी पुरस्कार स्वीकारताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. मान-सन्मान, कौतुक, सत्कार आणि पुरस्कार यांच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि गरजू घटकांसाठी जे काही शक्य आहे ते करत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात

आला.टीम परिवर्तन आणि अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये तन, मन आणि धन या स्वरूपात सहभागी होणाऱ्या सर्व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या सेवाकार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचेही नमूद करण्यात आले.तसेच, या सेवाकार्यात सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे योगदान देण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]