रायगड कन्या महिला मंडळ व हिरकणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्येमाने जागर स्त्री शक्तिचा कार्यक्रम झाला संपन्न
प्रतिनिधी पांडुरंग माने
रायगड :- रायगड कन्या महिला मंडळ व हिरकनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने मार्च 2026 रोजी महिला दिना निमीत्त गप्पा गोष्टी व रंजक खेळाचा सन्मान स्त्रीशक्तीचा-खेळ पैठणीचा महाराष्ट्रभर गाजत असलेल्या सर्व महिलांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.ह्या कार्यकमामध्ये गोरेगाव विभागातील सर्व महिलांनी मोठया प्रमाणात 
सहभाग घेतला होता सूत्रसंचालक म्हणून सुप्रसिद्ध कलाकार मा श्री किरण पाटील पुणे यांनी काम पाहिले ह्या वेळी विजेत्या महिलांना पैठणी तसेच आकर्षक भेटवस्तु देऊन गौणवण्यात आले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ शैलेजा गोखले, डॉ ज्योती गोरेगावकर, विद्या कुलकर्णी, आरती कुंभार, प्रांजल खामकर, सोनाली कासरेकर,मेघा खुळे यांना मंडळाकडून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले पहाटे सकाळी ६ वाजता राजमाता जिजाऊ माता मैदान ते रेल्वेब्रिज पासुन परत ३ किलो वोकेथॉन हिरकणी श्रीसखी वेगवेगळ्या प्रांतातील पद्धतीने परीधान केलेल्या पारंपरिक साडी च्या प्रकारांमध्ये आणि भारतातील सुप्रसिद्ध स्त्री व्यक्तिरेखा साकारत नठुन थटून आणि सजुन आत्मविश्वासाने स्वतः चे अस्तित्व जप त सामिल झाल्या होत्या. सामिल झालेल्या महिलांना सन्मान चिन्ह तसेच मेडल देऊन गौणवण्यात आले रायगड कन्या महिला मंडळ व हिरकणी महिला मंडळा च्या आरती कुंभार अपूर्वा पांचाळ सायली चुटके मधुरा परांजपे माधवी सूकाळे प्रीती गडकरी अम्रुता हरवडकर गौरी खुटवळ वर्षा लाड कीर्ती तांदळेकर शुभांगी शहा सोनाली कासरेकर यांनी कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी फार मेहनत घेतली आणि खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणात कार्यक्रम पूर्ण झाला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













