डोंबिवली येथील मैदानावर सामूहिक लेझीम वादनात विश्वविक्रमाची नोंदणी.
प्रतिनिधी
मुंबई (डोंबिवली) :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डोंबिवली-कल्याण शहर परिसरातील ७० हून अधिक शाळांमधील ९ हजार १११ विद्यार्थिनीनी रविवारी सकाळी डोंबिवली एमआयडीसी येथील सावळाराम महाराज क्रीडासंकुलाच्या मैदानावर सामूहिक लेझीम वादन करून विश्वविक्रमाची नोंदणी केली. नारीशक्तीचा जागर करण्यात आला. या वेळी लंडन हून आलेले अधिकारी स्वप्निल डांगरेकर यांनी विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेच्या पदाधिका-यांकडून स्वीकारताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व यांच्या पत्नी सुहासी चव्हाण यांच्याकडे विश्वविक्रम केल्याचे प्रमाणपत्र केले व तसेच होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल चे
मुख्याध्यापिका अश्वति नायर, सुपरवायझर ईस्टर नाडर , स्काऊट मास्टर विजेता रहाटे, सर्व महिला शिक्षिका रेश्मा,आशिता,वृषाली,गौरी,वैशाली,सावित्री,धनश्री,खुशी,अश्विनी,नंदनी,सुष्मिता,रक्षा,कल्पना,शीतल,बुश्रा,योगिता,गौरी,वर्षा,पुष्पा,डॉली ,शिल्पा ,स्टेफी , रीना , पूर्णिमा ,धनश्री ,सुवर्ण हे सर्व लेझीम मध्ये सहभागी झाल्या होत्या साडेपाच मिनिटे प्रात्यक्षिक सादर करून महिलांनी विक्रम केला. अशा देदीप्यमान सोहळाची साक्षीदार होण्यासाठी पहाटेपासून डोंबिवलीकर व कल्याणकर प्रतीक्षेत होते. अखेर विक्रम केल्याची घोषणा होताच जल्लोष करण्यात आला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













