नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सामुदायिक विवाहात सहभागी होणाऱ्या प्रत्येक जोडप्याला डॉ.सोन्या पाटील यांच्या कडून १ लाखांची घोषणा… – आजचा महाराष्ट्र

सामुदायिक विवाहात सहभागी होणाऱ्या प्रत्येक जोडप्याला डॉ.सोन्या पाटील यांच्या कडून १ लाखांची घोषणा…

प्रतिनिधी

ठाणे (भिवंडी) :- दि. ९ आगरी समाज उन्नती मंडळ, भिवंडी तालुका आणि आगरी वधू-वर परिचय मंडळ, भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने आगरी-कोळी समाजासाठी विनामूल्य वधू-वर परिचय मेळावा रविवारी (दि. ८ मार्च २०२६) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा मेळावा किशोर आर. सी. पाटील आगरी समाज भवन, चरणीपाडा, राहनाळ, अंजूरफाटा, भिवंडी (जि. ठाणे) येथे आयोजित करण्यात आला होता.बदलत्या सामाजिक परिस्थितीत युवक-

युवतींना योग्य जोडीदार मिळावा तसेच पालकांना संवादाचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.या मेळाव्यात एकूण १३४ वर पक्ष (मुले) आणि ७५ वधू पक्ष (मुली) यांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. आगरी-कोळी समाजबांधवांनी या उपक्रमाचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.यावेळी डॉ. श्री. सोन्या काशिनाथ पाटील, अध्यक्ष – समाज कल्याण न्यास, महाराष्ट्र राज्य यांनी भिवंडी तालुक्यातील आगरी-कोळी समाजातील वधू-वरांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक जोडप्याला एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. या घोषणेचे उपस्थितांनी स्वागत केले.या उपक्रमाबद्दल आगरी समाज उन्नती मंडळ, भिवंडीचे अध्यक्ष नामदेव पाटील आणि सचिव रमेश कराळे यांनी त्यांचे आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]