नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वाढदिवसानिमित्त खाडे परिवाराची समाजोपयोगी भेट – माणगाव उपजिल्हा रुग्णालयाला औषधसामग्रीचे दान – आजचा महाराष्ट्र

वाढदिवसानिमित्त खाडे परिवाराची समाजोपयोगी भेट – माणगाव उपजिल्हा रुग्णालयाला औषधसामग्रीचे दान

प्रतिनिधी दिलीप करकरे 

रायगड (माणगाव) :- समाजाप्रती आपली जबाबदारी जपत खाडे परिवाराकडून माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाला औषधसामग्रीची अनोखी भेट देण्यात आली. जय संतोष खाडे व राज संतोष खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.या निमित्ताने रुग्णालयाला आवश्यक असलेली वैद्यकीय सामग्री भेट म्हणून देण्यात आली. यात ७५० डोस इंजेक्शन, ५५० सिरींज तसेच २०१० उपयुक्त टॅबलेट यांचा समावेश आहे. रुग्णालयातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत आणि औषधांची कमतरता भासू नये या हेतूने ही मदत करण्यात आली.

खाडे परिवाराच्या या उपक्रमाचे रुग्णालय प्रशासन व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.या प्रसंगी गवळी मॅडम, डॉ. श्री. रजनीश पेणकर साहेब, अस्मिता तांबडे मॅडम, शुभांगी माटे (नर्स मॅडम) तसेच रुग्णालयातील इतर स्टाफ उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल तेटगुरे साहेब, जयेंद्र पालकर साहेब, सदू विठोबा पवार आणि धनराज पवार हे देखील यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना श्री. संतोष सिताराम खाडे यांनी समाजातील इतर नागरिकांनीही पुढाकार घेऊन सरकारी रुग्णालयांना त्यांच्या गरजेनुसार मदत करावी, असे आवाहन केले. “सरकारी रुग्णालयात अनेक गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. अशा ठिकाणी समाजातील लोकांनी मदतीचा हात पुढे केल्यास अनेकांना त्याचा फायदा होऊ शकतो,” असे ते म्हणाले.खाडे परिवाराने वाढदिवसाचे औचित्य साधत केलेल्या या सामाजिक कार्यामुळे परिसरात त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा प्रकारचे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून इतरांनीही यापासून प्रेरणा घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]