शिवजयंती निमित्ताने कंचाड येथील जि.प.शाळेमध्ये समाज कल्याण न्यास या संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप!
प्रतिनिधी
ठाणे (वाडा) :- अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी शुक्रवार दिनांक ६/३/२०२६ रोजी जिल्हा परिषद गट, गालतरे अंतर्गत मौजे कंचाड येथे महाराजांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देत त्यांच्या जयंती दिनानिमित्त श्री. शिंदे गुरूजी यांच्या सुमधुर वाणीने सादर केलेले शिवव्याख्यान व जिल्हा परिषद शाळा, कंचाड,यांच्या कडून लहान मुलांची महाराजांच्या जीवनचरित्रा वरील भाषणे, व्याख्याने, पोवाडे व शिव विचार पेरण्याचे काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने करताना आमचे ज्येष्ठ शिवसैनिक शाखाप्रमुख श्री. सतीशजी चौधरी व सौ. अंजलीताई चौधरी. शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच समाज कल्याण न्यास पालघर जिल्हा अध्यक्षा यांच्या पुढाकाराने शुक्रवारी मोठ्या उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमाचे 
औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा कंचाड येथील शाळेतील मुलांना समाज कल्याण न्यास संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.समाज कल्याण न्यास चे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्री.सोन्या काशीनाथ पाटील यांचे गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी चालू असलेले शैक्षणिक क्षेत्रातील अमूल्य योगदाना बद्दल या कार्यक्रमात समस्त नागरिकांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी सर्व पक्षातील मान्यवर नेते मंडळी उपस्थित होती .शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक व पदाधिकारी श्री. दौलतजी पाटील, श्री. अशोकभाई ठाकरे, श्री. शाम ठाकरे, श्री. रमेश ठाकरे, श्री. कीनी दादा, तसेच श्री. संदीपजी चौधरी .भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, पुष्कराज चौधरी, श्री अशोक शर्मा, स्व. हरिचंद्र चौधरी माजी शाखा प्रमुख यांच्या पत्नी, शिवसेना युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख सागर मानेवडे, नितीन चौधरी, राष्ट्रवादीचे श्री.बाळा चौधरी, श्री. सतीश पाटील तसेच शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक श्री. संदीपजी भोईर, विक्रमगड विधान सभा समन्वयक श्री. वैभवजी पाटील, माजी सभापती श्री. योगेशजी गवा, माजी सभापती श्री. संतोषजी बुकले , वाडा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष संदीपजी गणोरे, वाडा शहर प्रमुख श्री. राजू पाटील, वाडा महिला शहर प्रमुख सौभाग्यवती भावे , वाडा नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक श्री. अजिंक्य पाटील व श्री. उमेशजी लोखंडे, शिक्षक वृंद, ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी या स्तुत्य कार्यक्रमाची खूप प्रशंसा केली तसेच धर्मसेवक डॉ.सोन्या दादा पाटील यांचे शालेय शिक्षक वृंद यांनी शालेय विद्यार्थ्यांना केलेल्या शैक्षणिक साहित्याच्या मदतीबद्दल आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस धोबी यांनी केले. तर आभार प्रदर्शन समाज कल्याण न्यासच्या पालघर जिल्हाध्यक्षा सौ.अंजलीताई चौधरी यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













