संपादक डॉ.श्री.किशोर पाटील यांना “जीवन गौरव पुरस्कार” नगराध्यक्षा अर्चनाताई ठाकरे यांच्या शुभहस्ते प्रदान!
प्रतिनिधी
नागपुर :- स्मॉल ॲन्ड मिडीयम न्यूज पेपर असोशियन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संपादक एकदिवसीय खुले अधिवेशनात ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई चे प्रदेशाध्यक्ष (हल्ला विरोधी समिती) मा.डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांना “जीवन गौरव पुरस्कार” चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील नगरपंचायत वरोरा 
च्या नगराध्यक्षा अर्चनाताई ठाकरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घकालीन, उल्लेखनीय व निष्ठापूर्ण योगदानाची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न, घडामोडी व लोकहिताचे विषय सत्य, निष्पक्ष आणि निःस्वार्थपणे मांडण्याचे कार्य संपादक डॉ.श्री.किशोर पाटील यांनी सातत्याने केले आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे तसेच जनजागृतीची प्रभावी भूमिका बजावणे या त्यांच्या कार्याची स्मॉल ॲन्ड मिडीयम न्यूज पेपर असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी राज्यस्तरावर दखल घेतली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात जागरूकता निर्माण झाली असून नव्या पिढीतील पत्रकारांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.हा सन्मान सोहळा शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी नगर भवन, हनुमान वॉर्ड, वरोरा, जि. चंद्रपूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास राज्यभरातील पत्रकार, संपादक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडीबद्दल नगरपंचायत वरोरा च्या नगराध्यक्षा अर्चनाताई ठाकरे,संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव वाडकर, राष्ट्रीय सचिव ईश्वरसिंह सेंगर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष योगेश तुरेराव, राज्य अध्यक्ष संतोष धरमकर (महाराष्ट्र) तसेच राज्य सचिव आशिष घुमे (महाराष्ट्र) यांनी संपादक डॉ.श्री.किशोर पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













