भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी तर उपमहापौरपदी मोमीन अब्दुल तारिक बारी यांचा बहुमताने विजय!
प्रतिनिधी
ठाणे :- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आज दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता स्व. विलासराव देशमुख सभागृह येथे पार पडली. मा. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त श्री. अनमोल सागर (भा.प्र.से.) तसेच नगरसचिव श्री. अजय पाटील उपस्थित होते.महापौर पदासाठी तिरंगी लढत महापौर पदासाठी एकूण १० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उर्वरित ४ अर्जांपैकी २ अर्ज एकाच उमेदवाराचे 
असल्याने अंतिम तीन उमेदवारांमध्ये निवडणूक झाली.श्री. नारायण चौधरी, श्री. विलास पाटील आणि श्रीमती स्नेहा पाटील यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत श्री. नारायण चौधरी यांनी ४८ मते मिळवून विजय संपादन केला. श्री. विलास पाटील यांना २५ मते तर श्रीमती स्नेहा पाटील यांना १६ मते मिळाली.बहुमत मिळाल्याने श्री. नारायण चौधरी यांची महापौरपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा मा. पिठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ (जिल्हाधिकारी, ठाणे) यांनी केली.उपमहापौर पदासाठी चुरस उपमहापौर पदासाठी एकूण ७ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २ अर्ज मागे घेण्यात आले तर १ अर्ज अवैध ठरला. उर्वरित ४ अर्जांपैकी २ अर्ज एकाच उमेदवाराचे असल्याने अंतिम तीन उमेदवारांमध्ये निवडणूक झाली.श्री. जावेद दळवी, श्री. मोमीन अब्दुल तारिक बारी आणि श्री. सुहास नकाते यांच्यात झालेल्या निवडणुकीत श्री. मोमीन अब्दुल तारिक बारी यांनी ४३ मते मिळवून विजय मिळविला. श्री. जावेद दळवी यांना २५ मते तर श्री. सुहास नकाते यांना २१ मते मिळाली.यामुळे श्री. मोमीन अब्दुल तारिक बारी यांची उपमहापौरपदी निवड झाल्याची घोषणा मा. पिठासीन अधिकारी डॉ. पांचाळ यांनी केली.विजयी उमेदवारांचे अभिनंदन निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर मा. पिठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सभागृहात उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात विजेत्यांचे स्वागत केले.या निवडणुकीनंतर भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील सत्तेचे समीकरण स्पष्ट झाले असून, नव्या नेतृत्वाकडून शहराच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













