रेल्वेत चढता,उतरता सुरक्षेसाठी कायम काळजी घेणे-प्रा.डॉ.जयपाल पाटील
प्रतिनिधी
रायगड (कर्जत) :- आपले देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी विद्याथींनी शिक्षणा सोबत पारंपरिक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण प्रगती केली पाहिजे व नव्या रेल्वेने प्रवास करतांना खुप काळजी घ्यावी व कर्जत येथे होणाऱ्या रेल्वे यार्डात असंख्य नोकऱ्या साठी योग्य कोर्सचे प्रशिक्षण घ्यावे असे हुतात्मा हिराजी पाटील ज्युनिअर कॉलेज मधे संस्थेचे सल्लागार, रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यानी सांगितले. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या फाउंडेशन मावळ पुणे च्या अध्यक्षा स्वाती येवले, प्राचार्या मनिषा बैकर, संस्था सचिव 
नामदेव बैकर, माजी अंगणवाडी सेविका श्रीमती सौ.शालिनी सानप उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या अध्यक्षा तथा प्राचार्या मनिषा बैकर यांनी करुन कॉलेज च्या कार्याचा आढावा सांगितला. यानंतर भारत सरकार चा कौशल्य विकास कार्यक्रम पुणे परिसरात राबवितो तशाच प्रकारे आपल्या येथे अदिवासी मुला,मुलींना मोफत राबविण्याची इच्छा आपले अदिवासीसेवक डॉ.जयपाल पाटील यांना सुचविले, त्यानुसार आपणा सर्वांना भेटीचा योग आला व आपल्या आवडीनुसार कोर्स मोफत ,केंद्र सरकार कडुन प्रमाणपत्र देण्यात येईल असे श्रीमती स्वाती येवले त्यानी सांगितले.शेवटी सचिव नामदेव बैकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सतीश मराडे यांनी केले. यावेळेस हायस्कूलचे सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













