नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ठाणे शहरात ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ उत्साहात संपन्न! – आजचा महाराष्ट्र

ठाणे शहरात ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ उत्साहात संपन्न!

प्रतिनिधी

मुंबई (ठाणे) :- पोलीस आयुक्तालय ठाणे शहर व वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले रस्ता सुरक्षा अभियान २०२६ हे अभियान शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता ठाणे (पश्चिम) येथील गडकरी रंगायतन, तलावपाळी येथे मोठ्या उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सौरभ राव (भा.प्र.से.) हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध प्रतिनिधीत्व सिने कलाकार श्री.शरद तळपदे तसेच प्रतिनिधीत्व उद्योजक व अनुभवी मोटारसायकलस्वार श्री. अमित गणू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला ठाणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे (भा.पो.से.), पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण (भा.पो.से.) तसेच वाहतूक विभाग, ठाणे शहरचे पोलीस उप आयुक्त श्री. पंकज नवनाथ शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन, अपघात रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा तसेच सुरक्षित वाहनचालना संदर्भात जागरूक राहावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, वाहतूक पोलीस अधिकारी, आर एस पी अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.यावेळी आरएसपी अधिकारी तथा विभागीय समादेशक रस्ता सुरक्षा समन्वय अधिकारी ठाणे श्री.मनीलाल रतिलाल शिंपी, रस्ता सुरक्षा समन्वय अधिकारी ठाणे श्री.दिलीप विष्णू स्वामी व सर्व ठाणे जिल्ह्यातील आर एस पी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी ठाणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे (भा.पो.से.), पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण (भा.पो.से.) तसेच वाहतूक विभाग, ठाणे शहरचे पोलीस उप आयुक्त श्री. पंकज नवनाथ शिरसाट यांनी विभागीय समादेशक रस्ता सुरक्षा समन्वय अधिकारी ठाणे श्री.मनीलाल रतिलाल शिंपी यांचा विशेष सन्मान केला

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]