नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शालेय छोट्या मुलांकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची पालकांनी यादी कायम सोबत द्यावी-डॉ.जयपाल पाटील – आजचा महाराष्ट्र

शालेय छोट्या मुलांकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची पालकांनी यादी कायम सोबत द्यावी-डॉ.जयपाल पाटील

प्रतिनिधी

रायगड (अलिबाग) शाळेतील छोट्या मुलांनी आई-बाबांसोबत फिरावयास एस.टी.,रेल्वेत आणी मोठ्या यात्रेत गेल्यावर गर्दी मुळे दुरावलो तर घाबरून न जाता,व न रडता ,अनोळखी माणसा सोबत न जाता सुरक्षे साठी फक्त पोलीस मामा किव्हा पोलीस मावशी जवळ जाऊन खिशात ठेवलेली मोबाईल क्रमांक ची चिठ्ठी द्यावी म्हणजे सुरक्षित रहाल असे मार्गदर्शन प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी नागाव-

हटाळे येथील प्राथमिक शाळेत सांगितले.व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रश्मी राजेश भोपी, सहशिक्षक डाॅ,संदीप वारगे,सौ. सीमा नागावकर ,सौ. विजया माळी या उपस्थित होत्या. राज्य पुरस्कार प्राप्त डाॅ.संदीप वारगे गुरुजी यांनी जिल्ह्य़ातील आकाशातील ग्रह, चंद्र,तारे वरील प्रकल्प तयार करीत असल्याने ते पाहण्यास डॉ.जयपाल पाटील यांनी भेट दिली असता.त्याचा परिचय मुलानां करुन देऊन आपत्ती चे धडे देण्याची विनंती केली.यावेळेस श्रीमती भोपी यांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. डॉ.जयपाल पाटील यांनी संविधान वाचन मुलांकडून घेतल्या वर घरात आई वडील नसतांना,गॅस सिलेंडर, वीजेवर चालणाऱ्या वस्तु ची काळजी, शाळेत येताना,जातानां रस्ता ओलांडताना ची काळजी यांची माहीती मुलांना देऊन डाॅ.संदीप वारगे गुरुजी आकाशदर्शन अनोख्या प्रकल्पास शुभेच्छां दिल्या शेवटी मुख्याध्यापिका सौ.रश्मी राजेश भोपी यांनी आभार मानून मुलांनी राष्ट्रगीताने समारोप केला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]