नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तिसे पंचक्रोशीत शिवकालीन युद्धकलेचे संवर्धन : विद्यार्थ्यांना लाठी-काठी, दांडपट्टा प्रशिक्षण – आजचा महाराष्ट्र

तिसे पंचक्रोशीत शिवकालीन युद्धकलेचे संवर्धन : विद्यार्थ्यांना लाठी-काठी, दांडपट्टा प्रशिक्षण

प्रतिनिधी महेश स्वामी जंगम 

रायगड (रोहा – कोलाड) :- रोहा तालुक्यातील तिसे पंचक्रोशी येथे दिनाबाई मोरे शिक्षण संस्था संचालित कृष्णाजी संभाजी गोरीवले माध्यमिक विद्यालय, तिसे येथे विद्यार्थ्यांना आज लोप पावत चाललेल्या शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जात आहे. सेवा, ध्येय आणि सद्गुण या विचाराने प्रेरित होऊन विद्यालयाने हा उपक्रम सुरू केला असून विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, शिस्त आणि स्वसंरक्षणाची

भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दांडपट्टा, लाठी-काठी तसेच लेझीम यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नवनाथ गोदेसर, सहशिक्षक श्री. रवींद्र गिरासे, सौ. शारदा गोरीवाले मॅडम, शिपाई श्री. गणेश गोरीवाले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच लाठी-काठीचे विशेष प्रशिक्षण वस्ताद श्री. सहदेव यादव (विठ्ठलवाडी, माणगाव) देत आहेत.या प्रशिक्षणात इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थी सक्रिय सहभाग घेत आहेत. आजच्या काळात स्वसंरक्षण अत्यंत गरजेचे असून, विशेषतः स्त्रियांवरील वाढते अन्याय व अत्याचार लक्षात घेता अशा प्रकारचे प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे मुख्याध्यापक श्री. गोदेसर यांनी सांगितले. लाठी-काठी, तलवारबाजी यांसारख्या युद्धकलेचे प्रशिक्षण घेतल्यास विद्यार्थिनी सक्षम व आत्मविश्वासी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शालेय अभ्यासक्रमात इयत्ता चौथीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो; मात्र या विद्यालयात विद्यार्थ्यांना दरवर्षी इतिहासाची जाणीव व्हावी यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर शैक्षणिक भटकंती करून किल्ल्यांचा इतिहास, भौगोलिक रचना व ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगितले जाते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासप्रेम, राष्ट्रभक्ती आणि शारीरिक-मानसिक बळकटी निर्माण होत असून, शिवकालीन परंपरेचे संवर्धन करण्याचा विद्यालयाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]