खेड तालुका पत्रकार संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड) :- खेड तालुका पत्रकार संघाची बैठक शुक्रवार दि.३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद विश्रामगृह, खेड येथे संपन्न झाली. या बैठकीत सन २०२६ साठी संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष तथा दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी श्री. अनुज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.यावेळी तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी श्री. राजू चव्हाण यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 
दैनिक सागरचे ज्येष्ठ प्रतिनिधी श्री. किशोर साळवी यांची सचिवपदी निवड झाली आहे.उपाध्यक्षपदी दीप वहिनीच्या प्रतिनिधी सौ.अश्विनी वडके तसेच दैनिक रत्नागिरी टाइम्सचे श्री.इकबाल जमादार यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार माझे कोकणचे संपादक तसेच दैनिक सागरचे तालुका प्रतिनिधी श्री.सदानंद जंगम आणि ज्येष्ठ पत्रकार श्री.विनय माळी यांची निवड झाली आहे.संघाच्या सल्लागार म्हणून श्री.उत्तमकुमार जैन व श्री.श्रीकांत चाळके काम पाहणार आहेत. संघाचे माजी अध्यक्ष दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी श्री.अनुज जोशी हे संघाचे कार्यक्रम समन्वयक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.यावेळी दैनिक सागरचे सागर पाचरेकर उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.राजू चव्हाण यांनी आगामी काळात विविध सामाजिक व पत्रकारिताविषयक उपक्रम राबवून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी संघ प्रयत्नशील राहील, असे मनोगत व्यक्त केले.खेड तालुका पत्रकार संघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













