नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आंबेवाडीचे सुपुत्र सैनिक समीर साळुंखे यांचा सेवा निवृत्तीप्रसंगी भव्य नागरी सत्कार! – आजचा महाराष्ट्र

आंबेवाडीचे सुपुत्र सैनिक समीर साळुंखे यांचा सेवा निवृत्तीप्रसंगी भव्य नागरी सत्कार!

प्रतिनिधी

रायगड :- कोलाड (रोहा) तालुक्यातील आंबेवाडी–पुई येथील सुपुत्र श्री. समीर सदानंद साळुंखे यांनी भारतीय सैन्य दलात १७ वर्षांची निष्ठावान देशसेवा पूर्ण करून स्वगृही परतल्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी कोलाड आंबेवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य सेवा निवृत्ती स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या स्वागत सोहळ्याची सुरुवात आंबेवाडी गावच्या ग्रामदेवता श्री अंबर सावंत यांच्या चरणी नतमस्तक होऊन करण्यात आली. मंदिरात श्री. महेश जंगम स्वामी

यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले. श्री. समीर साळुंखे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण, पुष्पमाळा व आरती करण्यात आली. याचवेळी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या शौर्य दिनाचे औचित्य साधून आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर श्री. समीर साळुंखे यांचे औक्षण करून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला.श्री. समीर साळुंखे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी देशसेवेपर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांचे वडील मूळचे धानकाने येथील असून, केशकर्तन व्यवसाय करत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी कोलाड पूर्व आंबेवाडी येथे स्थायिक होत आपल्या मुलांवर उत्तम संस्कार घडवले. अत्यंत गरीब परिस्थितीतही शिक्षण, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या बळावर समीर साळुंखे यांनी वडिलांचे स्वप्न साकार करत भारतीय सैन्य दलात भरती होऊन जम्मू–काश्मीर, लडाख यांसारख्या संवेदनशील भागात देशसेवा बजावली.१७ वर्षांच्या निष्ठावान सेवेनंतर ते कुटुंबात परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. या आनंदात सहभागी होण्यासाठी पंचक्रोशीतील विविध समाजातील नागरिक, ग्रामस्थ, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंबेवाडी (कोलाड) ते पुई दरम्यान सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतराची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप पुई येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित छोट्या सभेत करण्यात आला.सभेत कार्यक्रमाची प्रस्तावना नंदकुमार मरवडे व यशवंत खराडे यांनी केली. यावेळी कोलाड पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक कदम, नाभिक समाजाचे महाड–रोहा तालुकाध्यक्ष श्री. दळवी, जिल्हाध्यक्ष श्रीयुत गायकवाड, पुई गावचे सरपंच मांडूसकर, भरत भोसले, संतोष गायकवाड, श्रीयुत जंगम स्वामी, बापू सोनगिरे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून श्री. समीर साळुंखे यांच्या देशसेवेचा गौरव केला.या कार्यक्रमाचे आयोजन कोलाड विभाग नाभिक समाज, नवतरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोलाड आंबेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. पंचक्रोशीतील अनेक समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.देशसेवेसाठी आयुष्याची १७ वर्षे अर्पण करणाऱ्या आंबेवाडीच्या या सुपुत्राचा हा सत्कार ग्रामस्थांच्या देशप्रेमाची व कृतज्ञतेची जिवंत साक्ष ठरला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]