नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वाशी येथे काशी तीर्थ यात्रे निमित्त गंगापूजन व शिवकीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न! – आजचा महाराष्ट्र

वाशी येथे काशी तीर्थ यात्रे निमित्त गंगापूजन व शिवकीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न!

प्रशांत मोरे 

रायगड (रोहा- वाशी) :-  वाशी रोहा येथे काशी तीर्थ यात्रे निमित्ताने जय भवानी महिला भजनी (नृत्य) मंडळ, वाशी–रोहा यांच्या वतीने गंगापूजन तसेच शिवकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता. ज्ञानभास्कर श्री. १०८ ष. ब्र. श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात हा सोहळा पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात

सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत गंगापूजनाने झाली. त्यानंतर दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांचे आगमन व मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर ५.३० ते ६.०० या वेळेत स्वागतगीत व मनोगत सादर केले .सायंकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांचे सुभाषित शिवकीर्तन आयोजित करण्यात आले होते, रात्री ९.०० ते १०.३० या वेळेत महाप्रसादाचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.हा कार्यक्रम वाशी (रोहा–रायगड) येथे पार पडला असून, कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियोजन जय भवानी महिला भजनी (नृत्य) मंडळ, वाशी तसेच समस्त काशी यात्रेकरू यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. विशेष सहकार्य ग्रामस्थ मंडळ (वाशी) व वीर शैव माहेश्वर मंडळ रायगड जिल्हा मा. मूर्ती श्री. लक्ष्मणस्वामी जंगम (लांढर) व समस्त जंगम समाज यांचे सहकार्य लाभले होते.या सोहळ्याला सर्व काशी यात्रेकरू, ग्रामस्थ व महिला मंडळाच्या भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व काशी तिथी प्रसादाचा लाभ घेतला,

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]