मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपतर्फे ऊसतोड कामगारांना थंडीपासून संरक्षणासाठी मदतीचा हात
प्रतिनिधी
नंदुरबार :- नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील परिवर्धे गाव व परिसरात ऊसतोडीसाठी वास्तव्यास असलेल्या कामगारांना थंडीपासून बचाव व्हावा व त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, या उदात्त हेतूने मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि.१८ व १९ डिसेंबर २०२५ रोजी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत थेट शेतात जाऊन ३२२ ऊसतोड कामगारांना ब्लँकेट व साड्यांचे मोफत वाटप करण्यात आले.थंडीच्या दिवसांत उघड्यावर वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांना अनेक आरोग्यविषयक अडचणींना सामोरे जावे लागते. 
ही बाब लक्षात घेऊन मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. श्री. मनीलाल रतिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला. गरजू घटकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून मदत करण्याची भूमिका या ग्रुपची नेहमीच राहिली असून, त्याचाच हा एक भाग असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव डॉ.श्री. यशवंत अनंत म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सेवानिवृत्त सचिव डॉ. यशवंत अनंत म्हात्रे,स्वामीनारायण मंदिर हॉल ट्रस्टचे संचालक डॉ. श्री. दिनेशभाई ठक्कर,रोटी डे ग्रुपचे प्रमुख डॉ.श्री. निखील चंदेरीया,पोलीस पाटील संघाचे माजी अध्यक्ष तथा आदित्य टाइम्सचे संपादक ॲड. सोमनाथ बाळाराम ठाकरे लाभले होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मानवसेवेच्या कार्याचे कौतुक करत समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप सामाजिक बांधिलकीतून सातत्याने राबवत असलेले उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांनी मांडले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













