नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भीमराव माने मित्र परिवाराचा दिवाळी फराळ वाटप उपक्रम: १० वर्षांची सामाजिक परंप – आजचा महाराष्ट्र

भीमराव माने मित्र परिवाराचा दिवाळी फराळ वाटप उपक्रम: १० वर्षांची सामाजिक परंप

प्रतिनिधी शशिकांत माथने

सातारा (मल्हारपेठ) :- तालुक्यातील ठोमसे येथील भीमराव माने मित्र परिवाराच्या वतीने गावातील आणि परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व साहित्याचे वाटप करण्यात आले. गेली दहा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमामुळे अनेक गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड झाली आहे.घारेवाडी येथील सेवा योग संस्थेने सुरु केलेल्या प्रेरणेतून, भीमराव माने मित्र परिवाराने हा दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम गेली एक दशकाहून अधिक काळ अखंडपणे सुरू ठेवला आहे. यंदाही ठोमसे, तांबेवाडी आणि गणेवाडी

येथील गोरगरीब कुटुंबांना दिवाळी मिठाई आणि आवश्यक साहित्याचे किट वाटप करून त्यांची दिवाळी आनंददायी करण्यात आली.गोरगरीब आणि होतकरू कुटुंबांबरोबर दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. यावर्षीही गावातील गरजू कुटुंबांना दीपावली मिठाई आणि साहित्याचे वाटप करण्यात आले.या अनोख्या व स्तुत्य उपक्रमाची मल्हारपेठ परिसरात मोठी वाहवा होत असून, सर्व स्तरातील मान्यवरांकडून या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले जात आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ठोमसे येथील सामाजिक कार्यकर्ते भीमराव माने यांच्यासह निरंजन डोंगळे, तानाजी पाटील, राजेंद्र माने सर, अभय दर्डा आणि सागर सर यांनी विशेष सहकार्य केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]