नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुणबी समाजाचे वैद्यकीय क्षेत्रातील उज्वल रत्न – डॉ. विवेक दिलीप अर्बन – आजचा महाराष्ट्र

कुणबी समाजाचे वैद्यकीय क्षेत्रातील उज्वल रत्न – डॉ. विवेक दिलीप अर्बन

प्रतिनिधी दिलीप करकरे 

रायगड(माणगाव) :- माणगाव तालुक्यातील अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारे आणि वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवेचा एक आदर्श निर्माण करणारे डॉ. विवेक दिलीप अर्बन हे नाव आता श्रद्धेने घेतले जात आहे.एम.जी. एम हॉस्पिटल, कळंबोली (पनवेल) येथे कार्यरत असलेले हे सेवाभावी डॉक्टर, कुणबी समाजाचे अत्यंत गौरवशाली प्रतिनिधी ठरले आहेत.निळगुंन गावचे रहिवासी आणि दिलीप सीताराम अर्बन व सौ. दिपाली दिलीप अर्बन यांचे सुपुत्र व डॉक्टर भावना दिलीप अर्बन यांचे बंधू असलेले डॉ. विवेक अर्बन यांच्याकडे माणगाव तालुक्यातील कोणताही रुग्ण पोहोचवला

गेल्यास, ते तात्काळ उपस्थित राहून आवश्यक ती वैद्यकीय सेवा देतात. त्यांच्या या तात्काळ प्रतिसादामुळे आतापर्यंत अनेक रुग्णांचे प्राण वाचले असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी अतिशय कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला जात आहे.सामान्य माणसाच्या हाकेला तत्परतेने प्रतिसाद देणारे, अहोरात्र न थकता रुग्णसेवेसाठी कार्यरत असलेले डॉ. अर्बन हे कुणबी समाजासाठी तसेच ग्रामीण भागातील गरजूंसाठी एक आशेचा किरण ठरले आहेत. संतोष संगीता सिताराम खाडे (परिवार) यांच्यातर्फे व श्री अनिलजी तेटगुरे साहेब डॉ. अर्बन यांना विशेष धन्यवाद आणि शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “डॉ. अर्बन यांच्या सेवेपुढे शब्द अपुरे आहेत. त्यांच्यासारख्या सुपुत्राचा जन्म घडवणाऱ्या मातापित्यांनाही आमचा मनःपूर्वक प्रणाम. त्यांच्या सेवेला कोटी कोटी प्रणाम डॉ. विवेक अर्बन यांचे कार्य हे वैद्यकीय क्षेत्रात समाजासाठी झटणाऱ्या प्रत्येकाच्या प्रेरणास्थान ठरत आहे.समाजात अशीच सेवा-संवेदना टिकून राहो, हीच अपेक्षा.अर्बन परिवाराने समजला दोन डॉक्टर दिले नुसते डॉक्टर नाही तर समाजातील सर्व सामान्य जनतेला सेवा देणारे देवदूत दिले. ग्रामीण भागातील एक गरज वंत पेशंट ला बायपास करू देण्यात सर्वस्वी पुढे असणारे देवदूत श्री डॉक्टर विवेक दिपाली दिलीप अर्बन यांनी सदर पेशंट ला जीवदान दिले योग्य मार्गदर्शन योग्य सहकार्य तात्काळ सेवा वेळच्या वेळी पेशंट ला आधार. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सहकार्य करणारे देवदूत यांना समाजपती असलेले जाणीव आपल्या आई-वडिलांकडून मिळाली शून्यातून विश्व निर्माण करतात याचे शिकवण देणारे आई-वडिलांना नमस्कार. पण समाजात गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी हिरा जन्माला घातलात आपल्या मेहनतीला कष्टाला ईश्वराने चांगले सहकार्य केले या सहकार्यातून आपण समाजाला दैव रुपी डॉक्टर दिलेत. आम्हाला सार्थ अभिमान आहे आपला आपणास उदंड आयुष्य लाभो व आपल्या मुलाकडून सर्वसामान्य लोकांचे सेवा चांगल्या प्रकारे घडो ही ईश्वराकडे प्रार्थना धन्यवाद श्री दिलीप अर्बन परिवार व परिवारातील डॉक्टर साहेब.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]