नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नूतन माध्यमिक विद्यालय, खरवली येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा! – आजचा महाराष्ट्र

नूतन माध्यमिक विद्यालय, खरवली येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा!

प्रतिनिधी दिलीप करकरे

रायगड (माणगाव) :-वाचन हीच खरी साधना, आणि ज्ञान हेच खरे धन,” या प्रेरणादायी संदेशाने भारलेले वातावरण निर्माण करत नूतन माध्यमिक विद्यालय, खरवली येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री. ढाकणे सरांनी भूषवले, तर कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल सौ. म्हात्रे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मंगल प्रार्थनेने झाली.या प्रसंगी

‘महावाचन महोत्सव २०२४’ अंतर्गत पुस्तक परिचय करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय विभागातर्फे बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन देऊन गौरविण्यात आले.कुमारी अनुष्का बेंदुगडे, सार्थ राजपूरकर, योगिनी लहाने, सलोनी लहाने, स्वरा मोंडे आणि श्रवण सोनकर या विद्यार्थ्यांनी नामवंत साहित्यिकांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे वाचन सादर केले. त्यांच्या वाचनाने कार्यक्रमाला साहित्यिक आणि भावनिक रंग चढवला.आपल्या मनोगतात बोलताना मुख्याध्यापक श्री. ढाकणे सरांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय ही केवळ ज्ञानासाठी नसून, ती विचार आणि कृतीला दिशा देणारी असते. वाचनातून विचार येतात, विचारातून कृती, आणि कृतीतून समाज बदलतो.”कार्यक्रमाच्या शेवटी सौ. खडतर मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.परीक्षेचा काळ असूनही विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी थोडा वेळ काढून आपल्या आवडत्या पुस्तकांचे वाचन करून वाचनाचा आनंद अनुभवला आणि ‘वाचन संस्कारांचा उत्सव’ घडवला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]