नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ऐन दिवाळीत बँकांचा खेळखंडोबा ! धनादेश वेटींगला. – आजचा महाराष्ट्र

ऐन दिवाळीत बँकांचा खेळखंडोबा ! धनादेश वेटींगला.

प्रतिनिधी सतिश पाटील 

मुंबई :- सरकारचा अजब कारभार देश प्रगतीपथावर जात असताना सर्वसामान्य जनतेचा विचार करून पुढील वाटचाल करत असते परंतू आजची परिस्थिती पहाता फक्त हूकूम शाही पध्दत अवलंबली जात आहे ऐन दिवाळीत सणात रिझर्व्ह बँकेने फतवा काढला वित्तिय संस्थेचा कारभार सगळ्यांसाठी सुलभ आणि सोयीस्कर होण्यासाठी एका दिवसात आपला धनादेश वटणार आहे परंतु हि योजना सुरू करण्यात आली आणि ठप्प झाली की केली गेली,हे एक कोडेच आहे कारण धनादेश जमा झाले परंतु योजनेनुसार कार्यवाही होत नाही

त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे राजकारणी लोकांना कोणताही फरक पडत नाही किंवा कोणीही बोंब मारत नाही सगळं कसं सुरळीतपणे सूरु आहे पण वैद्यकीय बिल, शैक्षणिक फी, आणि दिवाळीच्या सणाला होणाऱ्या आनंदावर जणू दुःखाची छाया पसरली आहे राज्यकर्त्यांनी ह्याचा गंभीर विचार करून दखल घ्यावी हिच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा अन्यथा सर्वसामान्य जनतेला निर्णय घ्यावा लागेल हे लक्षात घ्यावे.वित्तीय संस्थेचे अधिकारी देखील हतबल झाले आहेत. अराजकता आणि अशांतता निर्माण होत आहे ह्याचा उद्रेक होऊ नये ह्याची दक्षता त्वरित द्यावी.एक त्रस्त सर्वसामान्य नागरिक प्रकाश नारायण सावंत

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]