नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महिला चॅम्पियनशिप ब्रांझ पदक मनाली जाधव – आजचा महाराष्ट्र

महिला चॅम्पियनशिप ब्रांझ पदक मनाली जाधव

प्रतिनिधी सतिश पाटील

मुंबई:- महिला १० व्या एशियन स्पर्धेत भारताला महिला सुमो चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रांझ मिळवून दिले.फक्त महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नाव उज्ज्वल करणारी जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमीची आंतरराष्ट्रीय खेळाडू कु.मनाली चंद्रकांत जाधव हिचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.भिवंडीतील (दुगाडफाटा ) गावात रहाणार्‍या मनाली जाधव हिने आशियाई स्पर्धेत ब्रांझ मिळवून भारताचा झेंडा

अभिमानाने फडकवला. कोणतेही प्रशिक्षण नसताना फक्त टिव्हीवर हा कुस्ती खेळ बघून डाव आत्मसात केला.प्रथम किर्तीस्थान हरवले नंतर थांयलड बरोबर जिंकून ब्रांझ पदक मिळवून दिले.मनालीची घरची परिस्थिती तशी बेताची असल्याने एकावेळेस तीला हा खेळ बंद करण्याची वेळ आली होती म्हणतात ना सर्व सोंग करू शकता पण पैशाचे सोंग करू शकत नाही,ही गोष्ट जेव्हा समाज सेवक मा. निलेश सांबरे यांनी कळाली तेव्हा त्यांनी मनालीची भेट घेऊन पुढील सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवून तू फक्त लढ मी पाठीशी उभा आहे तेव्हा नव्या जोमाने पुन्हा तयारी करून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करून यशाच्या शिखरावर पोहोचण्याचे श्रेय मनाली सांबरे सरांना देत आहे आज त्यांनी मदतीचा हात दिला नसता तर ही या शिखरावर पोहचणे शक्य नव्हत असे मनाली जाधव आपल्या मुलाखतीत स्पष्ट सांगत आहे.यावरून एक गोष्ट लक्षात येते आपले ध्येय व चिकाटी,सातत्य कायम ठेवले तर अशक्य ही शक्य होते फक्त मेहनत व जिद्द अंगी असली पाहीजे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]