ज्येष्ठ नागरिक संघ गोरेगांव परीसर या संस्थेच्या नुतन कार्यकारीणीची झाली निवड
प्रतिनिधी पांडुरंग माने
रायगड (गोरेगाव) :- ज्येष्ठ नागरिक संघ गोरेगांव परिसर या संस्थेची मासिक सभा शुक्रवार दिनांक २६.०९.२०२५ रोजी गोरेगांव येथील संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री. सुरेश पालकर यांचे उपस्थितीत पुढील तीन वर्षा करिता खालील प्रमाणे पदाधिकारी व कार्यकारीणीची निवड एकमताने करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष श्री. रमेश गोविलकर, उपाध्यक्ष श्री वसंत शिगवण, सचिव अरविंद म्हशेळकर, खजिनदार श्री. महादेव गोरेगांवकर व सह सचिव श्री. नरेश सुर्वे यांनी मागील कार्यकाळात 
केलेल्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला. अध्यक्ष नरेश नारायण सुर्वे, उपाध्यक्ष. सत्यजीत पांडुरंग डांगे,सचिव विलास दत्ताराम मयेकर .खजिनदार श्री. महादेव धर्मा गोरेगांवकर,सहसचिव श्रीमती विमल चंद्रकांत दांडेकर,सदस्य हरिश्चंद्र भोगीलाल शहा, दशरथ हरी खाजणे,धनंजय पांडुरंग करंबे सौ. विजयालक्ष्मी रमेश गोविलकर सदस्य श्रीमती सीमा सुधाकर भुस्कुटे, सदस्य श्रीमती राजश्री रमेश सुर्वे सल्लागार – सुरेश बाबुराव पालकर सुभाष भिमाजी गायकवाड, रमेश वासुदेव गोविलकर उपस्थित बंधु भगिनींनी नुतन पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सल्लागार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













