माणगाव च्या टीएमसी काॅलेजमध्ये शिष्यवृत्ती वाटप
प्रतिनिधी दिलीप करकरे
रायगड (माणगाव) :- माणगाव येथील जे बी सावंत एज्युकेशन सोसायटीच्या टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज येथे सोमवार दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवाजी मंदिर दादर आणि सरस्वती एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मा.श्री. नानासाहेब सावंत यांच्या अथक प्रयत्नाने गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना छावा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मा. श्री. निलेशजी थोरे 
साहेब यांच्या शुभहस्ते ५१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रूपयांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.या धनादेश वाटपाच्या कार्यक्रमाला कॉलेजच्या प्राचार्य डॉ.अमृता देशमुख डॉ. जगदीश शिगवण , भारत पवार सर,सायगावकर मॅडम, सीनियर क्लार्क संजय गायकवाड, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कॉलेजच्या प्राचार्य डॉ.अमृता देशमुख यांनी आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













