जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे शिव भक्ती हीच माझी शक्ती
प्रतिनिधी महेश जंगम स्वामी
रायगड (रोहा – कोलाड) :- शेकडो वर्षांपूर्वी एक सोळा-सतरा वर्षाचं कोवळ पोर बादशाच्या गुलामगिरीला आव्हान देऊन रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतो आणि सबंध हिंदुस्थानाला स्वराज्य काय असतं याची ओळख करून देतो नंतर हाच कोवळा पोरगा श्री छत्रपती शिवाजी महाराज या नावाने अनंतकालासाठी आजरामर होऊन जातो त्याची युद्धनीती रणनीती लीडरशिप व्यवस्थापन आत्मविश्वास टीम वर्क दूरदृष्टी टाईम मॅनेजमेंट योग्य सहकाऱ्यांची निवड दीर्घकालीन विचार व छोटीशी 
सुरुवात या सर्व गोष्टींचा अभ्यासपूर्व सखोल माहिती किल्ले दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगड इतिहास अभ्यासक लेखक शिव व्याख्याते श्री यशवंत पुत्र मोहनदादा फराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वीर हनुमान युवक मंडळ तिसे दुसरे वर्ष रायगड अभ्यास मोहीम सुवर्णमय वातावरणात संपन्न झाली मोहन दादा मी आपलं शिव कार्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल शतशः ऋणी राहील आज कालाची गरज आहे छत्रपती शिवाजी राजे विचार समजून घेण्याचे कारण छत्रपती शिवाजी राजे फक्त आणि फक्त शिवजयंतीसाठी मर्यादित न राहता त्यांचे असणारे विचार प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये योग्य प्रमाणे ठासून भरण्याचे काम आपणकरत आहोत सदर मोहीम यशस्वी करण्याचे काम वीर हनुमान युवक मंडळ तिसे अध्यक्ष तुषार बिरगावले व सर्व शिव प्रेमी तिसे कर जय शिवराय
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













