नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आदिवासी कुटुंबीयांसाठी विशेष दाखला वितरण शिबिराचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

आदिवासी कुटुंबीयांसाठी विशेष दाखला वितरण शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :– माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या सूचनेनुसार व उपविभागीय अधिकारी खेड यांच्या निर्देशानुसार तसेच तहसीलदार श्री. सुधीर सोनवणे यांच्या आदेशानुसार सेवा पंधरवडा (१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५) निमित्ताने विविध योजना व दाखला वितरणासाठी मंडळ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.त्या अनुषंगाने २६ सप्टेंबर २०२५ रोजी भरणे मंडळाचा कॅम्प ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, खवटी येथे

आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खेड तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री. सुधीर सोनवणे रावसाहेब उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबातील सदस्यांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले.यावेळी मंडळ अधिकारी श्री. उमाकांत देशमुख, मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, परिसरातील सेवा सेतू सुविधा केंद्र संचालक, आधार कार्ड अपडेशन केंद्राचे प्रमुख, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबिरामध्ये आधार कार्ड अपडेशन, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्रासह शासकीय दाखले वितरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील सहभाग नोंदवून शिबिराला पाठिंबा दिला.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]