नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मे. साफोर्ड कंपनीतील कामगारांनी स्विकारले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व!! – आजचा महाराष्ट्र

मे. साफोर्ड कंपनीतील कामगारांनी स्विकारले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व!!

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

संघटनेच्या नामफलकाचे झाले अनावरण

रायगड (उरण) :- दि.२१ राजकारण, समाजकारण, करत असतानांही आपले पिंड असलेले कामगार क्षेत्रावरचे प्रेम तसुभरही न ढळू देता, कामगारांचे न्याय हक्क सदैव अबाधीत राखण्यात यशस्वी राहिल्यामुळे कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे कामगारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे कामगारांचा त्यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेकडे कल वाढलेला दिसत आहे. दरवर्षी नवीन १० ते १५ कंपन्यांतील कामगार महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारत आहेत. तळोजा एमआयडीसी

तील मे. साफोर्ड या कंपनीतील कामगारांनी अस्तित्वात असलेल्या दोन संघटनांना रामराम ठोकून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे. संघटनेच्या नामफलकाचे अनावरण शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले.यावेळी संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष पि.एस.म्हात्रे, संघटक विजय दाभणे, निलेश कदम, संजीवन कांबळे, भगवान ढोंगरे, संदीप म्हात्रे, मारुती पाटील, प्रकाश फडके, दिलीप पोरजी,मोहन फडके, रोहन कोळी,अनिल ढोंगरे, साफोर्ड कंपनीतील कामगार प्रतिनिधी अभिजित पाटील, निलेश म्हात्रे, नारायण कडू, दीपक गोंधळी, मोहम्मद कमाल हुसेन, निर्दास ठोंबरे, राजेंद्र मुंडे, चेतन पाटील, अभिमन्यू पाटील, शरद फणसे, उमेश पाटील, घनश्याम म्हशीलकर, संदीप गमरे, अविनाश मांडरे आदी उपस्थित होते.कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे उत्तम नेतृत्व व मार्गदर्शन सदर कामगारांना मिळणार असल्याने कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]