नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन! – आजचा महाराष्ट्र

ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन!

प्रतिनिधी सतिश पाटील

मुंबई :- ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ आणि विजेचा व विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर टाळून निसर्गाशी एकरूप होऊन जीवन व्यतीत करणाऱ्या डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे आज, शुक्रवारी (१९ सप्टेंबर) निधन झाले. त्या अविवाहित होत्या.हेमा साने यांचा जन्म १३ मार्च १९४० रोजी झाला. त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात एम. एस्सी. पी‌एच.डी. संपादन केली होती. भारतविद्या शास्त्रात त्यांनी

एम.ए., एम.फिल. केले होते. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अध्यापन कार्य केलेल्या साने या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या.निसर्गप्रेमी साने यांनी इतिहासाचादेखील अभ्यास केला होता. पुण्यातील जोगेश्वरी मंदिरासमोरील शीतलादेवी पार भागातील जुनाट आणि पडक्या वाड्यात त्या राहत. वाड्यात त्यांच्याबरोबर चार मांजरे, एक मुंगुस, एक घुबड, भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवट्या अशा पक्ष्यांचाही निवास होता.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]