नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गुटखा बंदी पण कारखाने बंद का नाही होत! – आजचा महाराष्ट्र

गुटखा बंदी पण कारखाने बंद का नाही होत!

प्रतीनीधी सतिश वि.पाटील

विधान परिषद सभागृहात मा. अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते (उ.भा.ठा. )यांची मागणी 

मुंबई :- राज्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे. मूळ उत्पन्नावर कारवाई होत नाहीतर छोट्या टपरी चालकावर कारवाई केली जात आहे.१ जून २०२५ रोजी इगतपुरी येथे गुटख्याचे दोन ट्रक पकडले गेले. ठाणे येथे सुद्धा मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडला गेला होता. सदरील खात्याचे अधिकारी नाहीतर वरिष्ठ पदावरील अधिकारी यांचा या गुटख्याच्या विक्रीत समावेश आहे. गुटखा विक्रीत गंभीर आरोपी असणाऱ्या गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. पोलिस या गुन्हेगारांना कारवाई करण्यापेक्षा ड्रायव्हर यांच्यावर कारवाई करतात. सहभागी पोलिस अधिकारी आणि पोलिस संरक्षण असणाऱ्या गुन्हेगारांवर

कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज विधान परिषद सभागृहात केली.साधारण गुटखा बाहेरील राज्यात निर्मिती करण्यात करण्यात येतो मग प्रश्न असा की कोणत्या मार्गातून महाराष्ट्र राज्य राज्यात येतो.याला सर्व यंत्रणाच जबाबदार आहे.लहान टपरीवर कारवाई फक्त एक दिखावा आहे बनवणारे मालक कधी पकडले जाणार ? असा गंभीर प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.हल्लीच ठाणे,वसई येथे गुटखा साठा जप्त केला होता.या घातक गुटख्या व्यसनाला चाप बसेल अनेक पिडीत तरुण या व्यसनाला बळी पडतात शाळा व काॅलेज विद्यार्थी ही गुरफटत जात आहेत वेळीच या कडे सरकार व गृहमंत्रालय यांनी लक्ष केंद्रित करून धडक कारवाई करून गुटखा किंगला व दलाल यांना जेरबंद करण्यात यावे !

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]