नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वाकण गोपाळवाडीच्या नवसाला पावणाऱ्या बाप्पाला वाजत गाजत दिला निरोप… – आजचा महाराष्ट्र

एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वाकण गोपाळवाडीच्या नवसाला पावणाऱ्या बाप्पाला वाजत गाजत दिला निरोप…

प्रतिनिधी पांडुरंग माने 

रायगड (माणगाव) :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पावन भूमीत वाकन गोपाळवाडी पोलादपूर येथे २००७ सालापासून भगवान राधाकृष्ण मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वाकन गोपाळवाडी यांच्या संकल्पनेतून एक गाव एक गणपती तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून गणरायाच्या मूर्तीची स्थापना दरवर्षी केली जाते. यावर्षी देखील दगडूशेठ हलवाई मूर्तीची स्थापना मोठ्या जल्लोषात करण्यात आली. गणरायाच्या आगमनापासून ते निरोपापर्यंत या मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रम घेतले जातात. पारंपारिक नृत्य, गाणी, फुगडी, पिठातून नाणे शोधणे, बाटलीत मिरची टाकने, कांदाफोड, बाल्यानृत्य, मेहंदी स्पर्धा, संगीत खुर्ची, वाकण ग्रामस्थ भजन, वाकण ग्रामस्थ महिला मंडळ भजन, हरिपाठ तसेच दररोज सहा दिवस सायंकाळी सहभोजन असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले गेले. या बाप्पाच्या चरणी अनेक भाविक नतमस्तक होऊन आपले गा- हाणे मांडत असतात. यामध्ये अनेक जणांना बाप्पाने त्यांच्या गा- हाण्याना प्रतिसाद देऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण केलेल्या आहेत असे मत या मंडळाचे कोषाध्यक्ष श्री संजय होळकर गुरुजी यांनी सांगितले  त्यामुळे अनेक गणेश भक्त बाप्पा चरणी लीन होतात मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल,उरण,गुजरात पासून मंडळी गावी येऊन बाप्पाचे दर्शन घेतात. यामध्ये भारतीय संस्कृती परंपरा, एकात्मता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वधर्मसमभाव, स्त्री पुरुष समानता अशी विविध मूल्य हे मंडळ जोपासत आले आहे. यावर्षी सात दिवस बाप्पा विराजमान झाले होते हे सात दिवसानंतर बाप्पांना निरोप देताना अनेक भक्त भावुक झाले होते. सालाबाद प्रमाणे याही वर्षी वाजत गाजत सावित्री नदीच्या तीरावर महाआरती करत नदीमध्ये लाडक्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]