नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कानिफनाथ भजन मंडळ डोलवी यांची संगीत मैफिल माळी सरांच्या बाप्पा चरणी – आजचा महाराष्ट्र

कानिफनाथ भजन मंडळ डोलवी यांची संगीत मैफिल माळी सरांच्या बाप्पा चरणी

प्रतिनिधी

रायगड (पेनडोलवी) :- श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डोलवी येथील कानिफनाथ भजन मंडळातर्फे एक सुंदर संगीत मैफिल माळी सरांच्या बाप्पाच्या चरणी सादर करण्यात आली. या प्रसंगी मंडळातील कलाकारांनी पारंपरिक भजने, अभंग आणि गवळणींची मनोहारी मैफिल सादर केली..या प्रसंगी मंडळाचे प्रमुख भजनकार बुवा मुकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळींनी सुमधुर भजने सादर केली.संगीत मैफिलीमध्ये हार्मोनियम, ढोलकी, टाळ या

वाद्यांच्या साथीने भक्तिरसाचा सुंदर संगम घडला. वातावरणात भक्तिभाव, आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. उपस्थित भाविकांनीही भजनांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वातावरण अधिक मंगलमय केले.गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे गावात भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले असून, कानिफनाथ भजन मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]