नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हॉटेलच्या पंचतारांकित पाहुणचाराने दिव्यांग विद्यार्थीसाठी ठरली मेजवानी.. – आजचा महाराष्ट्र

हॉटेलच्या पंचतारांकित पाहुणचाराने दिव्यांग विद्यार्थीसाठी ठरली मेजवानी..

प्रतिनिधी ता सचिन पावशे

आत्मनिर्भर संस्थेला दिली मदतीची ग्वाही

रायगड (अलिबाग) :- दि.२१ १५ ऑगस्ट रोजीअलिबागमधील आरसीएफ कॉलनीतील विशेष मुलांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना गोंधळपाडा येथील हॉटेल ताजने खास निमंत्रित करुन त्यांचा आगळावेगळा पाहुणचार केला.या पाहुणचाराने सारेच सुखावले, विशेष मुलांची शाळा अलिबाग येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आत्मनिर्भर पालक असोसिएशन संचलित विशेष मुलांचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र आरसीएफ कॉलनी अलिबाग येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी साडेसात वाजता संपन्न झाला यावेळी शाळेचे पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी हजर होते. मुलांना समाजाच्या विविध गोष्टीमध्ये सामावून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास

निर्माण करण्याच्या हेतूने ताज अलिबाग रिसॉर्ट अन्ड स्पा यांच्या कडून भेट देण्याचे आमंत्रण आले आणि मुलांच्या व शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता देसाई यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक इतर सहाय्यक व पदाधिकारी यांनी प्रथमच पंचतारांकित हॉटेलला भेट देत तेथील पाहुणचाराचा प्रथम ताज रिसॉर्टचे जनरल मॅनेजर अनंत गड्वाला यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले, सुरक्षारक्षकांची परेड झाली. आत्मनिर्भर पालक असोसिएशनचे अध्यक्ष विनायक देशपांडे यांनी शाळेविषयी प्रस्तावना सांगितली. त्यानंतर शाळेचा विद्यार्थी रोहित धुमाळ याने डान्स सादर केला, “ये मेरे वतन के लोगो “या गीताने सांगता झाली. सर्वांनी अल्पोपहाराचा आनंद घेतला सर्व ताज रिसॉर्ट मुलांना दाखवण्यात आले अनंत गड्डाला यांनी शाळेतील मुलांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच यावेळी आत्मनिर्भर पालक असो. चे अध्यक्ष विनायक देशपांडे म्हणाले कि, या मुलांसाठी ताज रिसॉर्टने राबवलेला हा उपक्रम अतिशय प्रशंसनीय होता. संस्थेच्यावतीने आम्ही विविध उपक्रम राबवून विशेष मुलांना आत्मनिर्भर बनविण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्थांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]