नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पावसाचा तडाखा मुंबईच्या लाईफ लाईनला बसला! इतरही वाहतुक सेवा कोलमडल्या, – आजचा महाराष्ट्र

पावसाचा तडाखा मुंबईच्या लाईफ लाईनला बसला! इतरही वाहतुक सेवा कोलमडल्या,

प्रतिनिधी सतिश वि.पाटील )

मुंबई :- पुन्हा २६ जुलैची पुनरावृत्ती अतिवृष्टीने मध्य रेल्वेची ठप्प छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) – मुलुंड ,ठाणे,कल्याण,वाशी, पनवेल,पश्चिम रेल्वे चर्चगेट, वसई दरम्यानची वाहतूक सकाळी ११:२५ नंतर ठप्प झाली. परिणामी कार्यालयांत जाण्यासाठी निघालेले प्रवासी ठिकठिकाणी अडकले. मुख्य मार्गावर रेल्वेची वाहतूक मंदावली होती. दिवसभरात मध्य रेल्वेच्या सुमारे ७२० आणि पश्चिम रेल्वेच्या १०० लोकल फेऱ्या रद्द झाल्या.मुंबईसह उपनगरांमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार सरींच्या वर्षावामुळे मध्य रेल्वेच्या मुंबईतून ठाण्यापर्यंतच्या सर्व रेल्वेगाड्या सकाळी रद्द करण्यात आल्या. लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे

प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी विमानतळावर पाणीच पाणी.एअर इंडियाच्या मुंबई विमानतळावर बॅरिकेडमुळे एअर इंडियाच्या विमानाचे नुकसान झाले आहे.किती मोठे नुकसान झाले आहे आणि अपघात कसा झाला याबद्दल अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल.नाहूरगावठाण व मुलुंड परिसरात पाणीच साठले होते. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न होणे ,नाले सफाई व्यवस्थित न करणे“रस्त्याची दुरावस्था अनेक वर्ष जैसे थे जनतेकडून सर्व टॅक्स वसूल करून ही सुखसोई पासून वंचित राहावे लागत आहेत मग मुलुंड ला कोणी वाली नाही का ? फक्त इलेक्शन पुरते विभागात फिरून बॅनर बाजी,रॅली आणि अश्वासने दिली जातात नंतर बाकी फिरकतही नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. निवडून आलेले स्थानिक कार्यसम्राट लोकप्रतीनीधी व प्रशासन या गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करून जनतेच्या अनेक समस्यां सोडवणार का भांडूप मध्ये दुखःद घटना कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणे एका सतरा वर्ष तरुणाच्या जीवावर बेतले. भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये शॉक लागून काल दीपक पिल्ले या १७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपक हा एल बी एस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता. परंतु रस्त्यात महावितरणाची हाय टेन्शन वायर खुली होती. त्या मधून झालेल्या विजेचा प्रवाहामुळे शॉक लागून दिपकचा मृत्यू झाला. प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार दीपक याने कानात हेडफोन घातले होते. येथील नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यासाठी आवाज देखील दिले, परंतु कानातल्या हेडफोन मुळे त्याला ऐकू आले नाही आणि तो या वायर च्या संपर्कात गेला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. महत्त्वाचा म्हणजे येथील नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या अनेक जणांना सूचना करून येथून बाजूला जाण्यास सांगितलं होतं. त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण येथील स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]