नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शेगाव पाथर्डी तालुका अहिल्यानगर सरकार मायबाप या गावाचा रस्ता कधी होणार! ५०वर्ष वंचित – आजचा महाराष्ट्र

शेगाव पाथर्डी तालुका अहिल्यानगर सरकार मायबाप या गावाचा रस्ता कधी होणार! ५०वर्ष वंचित

प्रतिनिधी सतिश वि.पाटील

महीला सरपंचांची गाडी अडवून चिखलफेक शाळेतील मुलांनी जाब विचारला 

मुबंई :- अनेक वर्ष ही शाळेतील मुल चिखल तुडवत शाळेत जात आहेत एकी मोठा डंका वाजवण्यात येतो अमुकतमुक रस्ता ,महामार्ग बनवून कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचणार अशा विकास व स्मार्ट सिटी,अमुक एक विमान तळे बनवायचे नेते भाषण ठोकून मोकळे होतात पण प्रत्यक्षात काय अवस्था आहे याचे गांभीर्य कधी सरकार घेणार का ?अशा प्रश्नांना जनता सुद्धा जबाबदार आहे. अनेक छोट्या छोट्या गावांची ही समस्या आहे. सर्वांनी एकत्रित येऊन पूर्णपणे मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे परंतु गावात गट तट, अनेक पक्ष यामुळे लोक एकत्र येत नाहीत आणि समस्याही सुटत नाहीत.

आमदार खासदारांना गावातच येऊ द्यायचे नाही. तहसीलदाराला निवेदन देऊन मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घालायचा सगळे सरळ होतील परंतु स्वातंत्र्य आले आणि गटातटात गाव विभागले गेले आणि छोट्या छोट्या गावांचे प्रश्न सुटेनासे झाले. हल्ली लोकांना रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत प्रश्नांपेक्षा मोफत तीर्थयात्रा गोष्टी महत्त्वाच्या वाटतात आणि यामध्येच लोकप्रतिनिधी जनतेला अडकवून ठेवतात. जाती-जातीचे पुढारी त्यांनी शोधले आहेत तेवढे पुढारी हाताशी धरले म्हणजे त्यांना एक गठ्ठा मतदान होते. मूलभूत प्रश्नांचे त्यांना काही सोइर सुतक नाही आणि जनता ही भोळीभाबडी आहे. त्यांना अशा गोष्टी दिल्या की ते शांत बसतात. आता तर हजारो सरकारी शाळा त्यांनी बंद केल्या आहेत आणि नविन दारूच्या परवानगी दिल्या आहेत. स्पष्ट आहे लोक शिक्षित झाले म्हणजे प्रश्न विचारतात. कावड यात्रा याला प्रोत्साहन द्यायचे त्यांच्यावर फुले उधळायची आणि शाळा बंद करायच्या… वारे मायबाप सरकार… गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे.या बाबतीत पुर्ण विडिओ सद्या मिडीयावर व्हायरल होत आहेn .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]