नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बेकायदेशीररित्या गोमांसची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना गोरेगांव पोलिसांनी केली अटक – आजचा महाराष्ट्र

बेकायदेशीररित्या गोमांसची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना गोरेगांव पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी पांडुरंग माने

रायगड (माणगाव – गोरेगाव) :- बेकायदेशीररित्या गोमांसची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना गोरेगांव पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून वाहनासह सुमारे ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही घटना १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ५.४५ वाजण्याच्या दरम्यान तारणे येथे घडली.गोरेगांव पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमांस विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर, गोरेगांव पोलिसांनी

तारणे येथे जावून, उमर इस्माईल गैबी (वय ५०, रा. तारणे मोहोल्ला, ता. माणगांव) याला आणि गोमांसची विक्री करणारा अकबर म्हसकर (रा. मोर्बा मोहोल्ला) या दोघांना अटक केली. यावेळी पोलिसांनी या दोन आरोपींकडून दोन हजार रुपये किंमतीचे सुमारे १० किलो गोमांस, आणि ५० हजार रुपये किंमतीचा टाटा टेम्पो क्रमांक एमएच०६,बीजी -२२२७ असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.आनंद सुरेश राजभर (वय ३४, रा. अयोध्यानगर, चिंचवली) यांनी गोरेगांव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, गोरेगांव पोलिसांनी उमर गैबी आणि अकबर म्हसकर या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ क, ९ अ, ११ अन्वये गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक केली.  दरम्यान आरोपी अकबर म्हसकरच्या विरोधात यापूर्वी असाच एक गुन्हा माणगांव पोलीस ठाण्यात दाखल आहे.या प्रकरणी गोरेगांव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. एस.एन. रासकर हे अधिक तपास करित आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]