नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तुकाराम हरी वाजेकर विद्यालयात टॉपर विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण – आजचा महाराष्ट्र

तुकाराम हरी वाजेकर विद्यालयात टॉपर विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) :- दि १५ आजादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय, फुंडे येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनी कुमारी श्रावणी दशरथ कोळी हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य बी.बी. साळुंखे यांनी घेतलेल्या या अभिनव निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले व देशभक्तिपर गीतांनी वातावरण

भारावून गेले.प्राचार्य यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त आणि परिश्रम यांचे महत्व पटवून दिले.यावेळी उपमुख्याध्यापिका एस. डी.थोरात,शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]