खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी, संचलित, न्यू इंग्लिश स्कूल व श्री.पी.के. दरेकर ज्युनिअर कॉलेज खवटी. प्रशालेमध्ये आपल्या महान भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
रत्नागिरी (खेड) :– संस्थेचे अध्यक्ष श्री विजय दरेकर यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. ध्वजाला सलामी देत विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व झेंडा गीत आणि राज्य गीत सादर करून भारत मातेचा जयघोष केला याचबरोबर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी परेड देखील सादर केले. अध्यक्षांनी उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांना भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाप्रसंगी संस्था उपाध्यक्ष श्री मन्सूरभाई जोगिलकर, तसेच संस्थेचे संचालक व माजी संचालक तसेच सदस्य, खवटी ग्रामपंचायत सरपंच, खवटी पाखरवाडी गाव पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक ,राजकीय व आर्थिक क्षेत्रातील पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री माळी सर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशालेचे विद्यार्थी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रांगणातील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.त्यानंतर एस.एस.सी व एच. एस. सी .परीक्षा २०२५ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सभागृहामध्ये संपन्न झाला.या कार्यक्रमांमध्ये प्रथम अध्यक्ष श्री विजय दरेकर व संस्था पदाधिकारी व मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेचे पूजन, दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.प्रशालेतील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत पद्य सादर करत मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्था सहसचिव श्री अविनाश वाडेकर, संचालक श्री संतोष पवार, श्री लहू सुर्वे, खवटी पाखरवाडी गावचे पोलीस पाटील श्री अमोल दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री सुभाष दळवी, माजी सचिव श्री सुरेश शिंदे,श्री कैलास यादव, ज्येष्ठ माजी संचालक श्री चंद्रकांत दळवी, श्री विलासराव दळवी, संस्था सदस्य सौ लक्ष्मी दळवी, श्री महेश दळवी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री विजय चव्हाण, सदस्या सौ.वृषाली सुर्वे,सौ. सुरेखा वाघे, खवटी पोस्ट ऑफिस मॅनेजर श्री दीपक शर्मा, आरोग्य समुपदेशक तज्ञ सौ अल्हाट मॅडम, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री प्रदीप वालंकर व श्री विशाल दळवी, ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्री राम गवळी, कोकण कट्टा न्यूज रिपोर्टर श्री राजेंद्र दळवी, सामाजिक कार्यकर्ते श्री अक्षय बेलोसे व श्री संदीप बेलोसे, तसेच ग्रामस्थ, पालक वर्ग, एस.एस.सी व एच. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी , प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माळी सर, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते.प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माळी सर यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आले.तदनंतर एसएससी बॅच २०१६- १७ मधील विद्यार्थ्यांनी प्रशालेला रु. २२०००/- किमतीचे खेळाचे साहित्य भेट दिले . प्रतिनिधी स्वरूपात श्री शुभम दळवी व पृथ्वीराज दळवी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर अगस्त इंटरनॅशनल फाउंडेशन व फिरती विज्ञान वाहिनी , यांनी प्रशालेला महिन्यातून दोन वेळा विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिके दाखवणे व कृती करून घेणे हा उपक्रम सुरू केला आहे. तसेच विज्ञान प्रयोग साहित्याचे आठ बॉक्स प्रशालेस भेट दिले त्याबद्दल प्रतिनिधी श्री 
किरण ताम्हणकर व श्री शुभम जंगम यांचेदेखील अध्यक्ष व सहसचिव आणि पदाधिकारी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.याचबरोबर संस्थेचे माजी अध्यक्ष श्री वाय.एस .मोरे . यांच्या सहकार्याने सौ. मीरा लोहारकर यांच्या वडिलांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त रू. ५०,०००/- कायम स्वरूपी ठेव म्हणून सहकार्य लाभले. या रकमेच्या व्याजाiतून इंग्रजी विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ई. १० वी .व इ . १२ वी मधील विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येतील. यांना देखील धन्यवाद देण्यात आले.संस्थेचे उपाध्यक्ष श्री मन्सूरभाई जोगिलकर यांच्या सौजन्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १५ ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच प्रशालेसाठी रुपये एक लाख किमतीचे विज्ञान साहित्य तसेच रुपये एक लाख किमतीचे संपूर्ण परिसरासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून दिले. याचबरोबर ०१ जून रोजी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गोड खाऊ व जेवण खाऊ घातले. पोषण आहार खोलीसाठी एक्झॉस्ट फॅन दिले. तसेच विद्यार्थ्यांना आणखीनही बक्षीस दिली जातील. भाईंना देखील धन्यवाद देण्यात आले.तसेच खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्स वाटप करण्यात आले. खवटी ग्रामपंचायत मार्फत प्रशालेसाठी स्वच्छतेचे सर्व साहित्य व १५ ऑगस्ट निमित्त सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट देण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री विजय चव्हाण यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट खाऊ दिले. शाळा व्यवस्थापन समिती माजी सदस्य श्री गंगाराम दळवी यांनी प्रशालेची लाईट फिटिंग सुरळीत करून दिली अशा सर्व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे शुब्द सुमनांनी धन्यवाद व्यक्त करण्यात आले.यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माळी सर यांनी प्रास्ताविक सादर करत सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तदनंतर एस.एस.सी परीक्षा तसेच एच. एस. सी. आर्ट्स व कॉमर्स परीक्षा २०२५ ,उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा तसेच एस. एस. सी. परीक्षेमध्ये, इंग्रजी व गणित विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी, N.M.M.S. परीक्षेमध्ये मेरिट लिस्ट मध्ये आलेले विद्यार्थी, तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामधून आदर्श विद्यार्थी पुरस्कार सोहळा तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे भरघोस बक्षिसे देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच बक्षीस दात्यांना धन्यवाद व्यक्त करण्यात आले.यानंतर संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचे सत्कार करण्यात आले. अध्यक्ष श्री विजय दरेकर यांनी अध्यक्षीय भाषण करत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व दहावी परीक्षेमध्ये ९० % गुण मिळवणाऱ्या व बारावी मध्ये ८५ % गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रू. ११००० /- बक्षीस जाहीर केले.त्यानंतर उपस्थित सर्व संस्था पदाधिकारी व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय दळवी सर यांनी केले व अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केल्या.सभागृहातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा संपन्न झाल्यानंतर शासनाच्या परिपत्रकानुसार देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्ती गीतावर आधारित विद्यार्थ्यांनी कवायत प्रकार सादर करून भारत मातेचा जयघोष केला.कवायत प्रकार मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे व विद्यार्थ्यांचे अध्यक्षांनी शब्द सुमनांनी अभिनंदन केले.सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













