स्मार्ट व्हिलेज” मुर्वीमध्ये अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव – मनसेचा पनवेल मनपाला इशारा
प्रतिनिधी सतिश पाटील
रायगड (पनवेल – खारघर) :- ११ ऑगस्ट २०२५ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्र. ४ चे कार्यकर्ते कु. ऋतीक आत्माराम नावडेकर यांनी पनवेल महानगरपालिकेला एक लेखी निवेदन देऊन खारघरमधील मुर्वी गावातील गंभीर नागरी समस्यांकडे लक्ष वेधले आहे.पनवेल मनपाने खारघर येथील मुर्वी गावाला “स्मार्ट व्हिलेज” म्हणून घोषित केले असले तरी, गावातील पर्णातू विभागात अजूनही ड्रेनेज लाईन आणि रस्त्यांचे काँक्रिटीकरण झालेले नाही. यामुळे
पावसाळ्यात साचणारे पाणी, सांडपाणी रस्त्यावर वाहणे आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या समस्यांमुळे डेंग्यू, मलेरिया व इतर आजारांचा प्रकोप वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.कु. ऋतीक नावडेकर यांनी आपल्या निवेदनात पालिका प्रशासनाला तातडीने उपाययोजना करून ड्रेनेज लाईन आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण तात्काळ पूर्ण करण्याची विनंती केली आहे. तसेच, स्मार्ट व्हिलेज म्हणून घोषित करण्यात आलेल्या गावांना किमान मुलभूत नागरी सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे स्पष्ट केले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













