नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हा एकदा रवाना – आजचा महाराष्ट्र

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हा एकदा रवाना

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) :- दि १२ अतिशय खडतर असलेली कैलाश मानसरोवर यात्रा, परंतु पुन्हा एकदा यात्रा करून महादेवाचे दर्शन घ्यावे व देवाचे आभार मानावे यासाठी रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आपल्या सहकाऱ्यांसोबत दिनांक १० ऑगष्ट रोजी रवाना झाले आहेत.हिंदू धर्मातील महत्वाचे दैवत असलेल्या महादेवावर अपार श्रद्धा असलेले महेंद्रशेठ घरत ह्यांनी २०१८ साली कैलाश यात्रा केली होती. त्यानंतर त्यांचे आयुष्यचं बदलून गेले,

त्यांना यश व आर्थिक सुबत्ता मिळाली. त्यानंतर तर त्यांची देवावरची श्रद्धा अजून दृढ झाली व जे काही आपल्याला मिळालेय ते देवाचे देणे आहे आपण आपल्या गरजे पुरते ठेऊन गोरगरिबांना मदत, दानधर्म ते करत राहिले. त्यानंतर ते समाजात दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाऊ लागले, आपल्या घरी आलेला एकही गरजू रिकाम्या हाती परत जाणार नाही याची काळजी ते घेऊ लागले.गरिबांच्या कल्याणासाठी देवाने आपल्याला अपेक्षेपेक्षा भरभरून दिल्याने महादेवाचे आभार मानावे व त्यांच्या आशिर्वाद घ्यावा यासाठी ते आपले सहकारी वैभव पाटील, मुरलीधर ठाकूर व प्रित म्हात्रे यांच्यासह पुन्हा एकदा कैलाश यात्रेला रवाना झाले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]