नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आईच्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळेस शैक्षणिक व फर्निचर मदत – आजचा महाराष्ट्र

आईच्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळेस शैक्षणिक व फर्निचर मदत

प्रतिनिधी शशिकांत माथने 

किल्ले मोरगिरीचे सुपुत्र उद्योजक अशोक अवघडे यांचा प्रेरणादायी सामाजिक उपक्रम

मल्हारपेठ :- किल्ले मोरगिरी गावातील सुपुत्र आणि यशस्वी उद्योजक श्री. अशोक शंकर अवघडे यांनी आपल्या मातोश्री कै. शेवंताबाई शंकर अवघडे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त गावातील जिल्हा परिषद शाळेस शैक्षणिक साहित्य, फर्निचर आणि रोख स्वरूपात देणगी दिली. तसेच, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारत त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी उचलली.श्री. अवघडे यांनी मागील चार वर्षांत आपल्या मूळ शाळेस सातत्याने मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत त्यांनी सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांची रोख मदत तसेच कपाट, खुर्च्या, फर्निचर यासह प्रत्येक वर्षी इयत्ता १ लीपासून पुढील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. या वर्षीही त्यांनी हा उपक्रम पुढे चालू ठेवत शाळेस आवश्यक साहित्याची मदत केली.या वेळी जिल्हा बँकेचे माजी शाखाप्रमुख रमेश दाभाडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. कारंडे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण लाड, सरपंच आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात बोलताना श्री. अशोक अवघडे म्हणाले की, “माझ्या यशामागे या शाळेचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच आज या शाळेस काहीतरी देणं हे माझं कर्तव्य आहे.”मुख्याध्यापक श्री. कारंडे यांनी अवघडे यांच्या सातत्यपूर्ण मदतीबद्दल आभार मानले, तर स्कूल कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण लाड यांनी त्यांच्या या सामाजिक योगदानाचे कौतुक करत भविष्यातील सहकार्याबाबत आशा व्यक्त केली.श्री. अशोक अवघडे यांचे सामाजिक दातृत्व आणि गावाविषयी असलेली नाळ आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गावकऱ्यांतून आणि विविध स्तरांतून त्यांच्या या कार्याचे भरभरून कौतुक होत आहे.

चौकट:- शाळेसाठी मदत करताना मी कधीही संकोच ठेवला नाही. शैक्षणिक कामातील ही मदतच भविष्यात यशस्वी उद्योजक आणि अधिकारी घडवेल. स्पर्धा परीक्षांतून या गावातील मुले जेव्हा अधिकारी बनतील, तेव्हा ही मदत खरी सार्थकी लागेल.श्री. अशोक शंकर अवघडे (उद्योजक

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]