नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा संपन्न. – आजचा महाराष्ट्र

टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा संपन्न.

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) :- दि.९ पंचायत समिती उरण येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा घेण्यात आली. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, महिला व बाल विकासचे काळे सर, खाजगी वैद्यकीय अधिकारी डॉ. साठे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र गव्हाणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल सर, प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली चे वैद्यकीय अधिकारी डॉ.कविता भगत , सर्व सीएचओ, औषध निर्माण अधिकारी श्री. थळे,आरोग्य

सहाय्यक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. सभेमध्ये पुढील चार महिन्यांमध्ये टीबी मुक्त ग्रामपंचायतचे सर्व टार्गेट पूर्ण करून घेण्याबाबत तसेच प्रत्येक उपकेंद्र व ग्रामपंचायत अंतर्गत टीबी विषयी जन जागृती करिता करावयाच्या बाबींबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. उपचारावरील रुग्णांना उपचार पूर्ण करून घेण्याबाबत चे नियोजन,आर्थिक व सामाजिक आधार देण्याबाबत संबंधित ग्रामपंचायत वर जबाबदारी देण्यात आली.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]