खालिद का शिवाजी” चित्रपटावर बंदीची मागणी; कोलाडमध्ये सकल हिंदू समाजाचे निवेदन
प्रतिनिधी
रायगड (रोहा– कोलाड) :– दि.७ “खालिद का शिवाजी” या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची व विकृती करून दिशाभूल करणाऱ्या माहितीचा समावेश असल्याचा आरोप करत रोहा तालुक्यातील सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी संघटनेने आज माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक कोलाड निवेदन सादर केले.संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “खालिद का शिवाजी” या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम मावळे होते, रायगडावर मज्जीद 
बांधली गेली, तसेच महाराजांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते असे दावा करण्यात आला आहे. ही माहिती इतिहासाशी विसंगत असून कोणतेही ऐतिहासिक पुरावे नसताना अशा स्वरूपाचा खोटा इतिहास पसरवणे हे मराठी माणसाच्या आत्माभिमानावर आघात असून, हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर, सदर चित्रपट रोहा तालुक्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.संघटनेचे श्री. महेश जंगम स्वामी, अजय लोटणकर, विजय शिंदे, भरत सातांबेकर, अनंत जोशी, गणेश वाचकवडे, गणपत लोखंडे, सुजित झा, कुमार कामेश, विराज शिंदे, राजेश कदम, श्रीनिवास जोशी इत्यादी उपस्थित होत .स्थानिक नागरिकांतही या चित्रपटाबाबत नाराजीचा सूर असून प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













