मोफत नेत्र तपासणी शिबिर लोधिवली येथे — ग्रामस्थांसाठी उत्तम संधी!
प्रतिनिधी
रायगड (खालापुर – लोधीवली) :- ग्रामपंचायत लोधिवली येथे दिनांक ५ ऑगस्ट २०२५, मंगळवार रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर डाॅ. सुहास हळदीपुरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, पनवेल तसेच मा. आमदार महेश बादली (उरण विधानसभा, जि. रायगड) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवले जात आहे.या शिबिरात मोफत डोळ्यांची तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तसेच अल्पदरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेषतः गरजू, गरीब आणि आदिवासी वस्तीतील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन
ग्रामपंचायत व आयोजकांनी केले आहे. शिबिराचे तपशीलः दिनांक: ०५/०८/२०२५ (मंगळवार)वेळ: सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० स्थळ: जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर, लोधिवली, ता. खालापुर, जि. रायगड विशेष सूचना:मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पनवेल येथे ने-आण करण्याची सोय करण्यात आली आहे.इच्छुक रुग्णांनी रेशन कार्ड, आधार कार्डाची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आणि चालू औषधांची माहिती सोबत आणावी.डोळ्यांचे सर्व आजार व समस्यांवर शिबिरात उपचार करण्यात येणार आहेत.संपर्क:श्री. विनोद पाचघरे: ९५९४९८६८१८ श्री. निखिल पाटील (ग्रा.पं. सदस्य): ७०८३१३११०० श्री. सुभाष शिदे (ग्रा.पं. सदस्य): ९९७००६२०५६ शिबिराचे आयोजन करताना लोधिवली ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलिस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मंडळ यांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













