नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार साठी उरणचे सुपुत्र शिक्षक प्रविण पाटील यांची निवड – आजचा महाराष्ट्र

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार साठी उरणचे सुपुत्र शिक्षक प्रविण पाटील यांची निवड

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) :दि २ शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी जाहीर केला जातो. २०२५ या वर्षी रायगड जिल्ह्यातून प्रवीण जनार्दन पाटील उपशिक्षक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदायलेवाडी तालुका उरण यांची निवड करण्यात आली आहे. प्रवीण जनार्दन पाटील यांची एकूण सेवा २८ वर्ष झालेली आहे. या सेवेत त्यांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, जिल्हा शिक्षण व व्यावसायिक विकास संस्था पनवेल रायगड येथे विषय सहाय्यक म्हणून काम केले आहे. गेली १८ वर्षे आदिवासी वाडीवर शिक्षक म्हणून कार्य केलेले आहे.महाराष्ट्र शासन आयोजित सिंगापूर या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यात प्रवीण पाटील यांनी सहभाग घेतला आहे. देश पातळीवरील गुवाहाटी सिक्कीम या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणात सहभाग घेतलेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना राज्यात व राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी समन्वयक म्हणून शिक्षक प्रवीण पाटील यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. सामाजिक जीवनात अनेक आदिवासी लोकांना विविध प्रकारचे दाखले काढून देण्यात प्रवीण पाटील हे मदत करत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक कार्य करण्यात प्रवीण पाटील यांनी अग्रेसर भूमिका घेतली आहे. या व अशा अनेक विविध कार्य केलेले असल्याने या कार्यामुळे रायगड जिल्ह्यातून राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत असून शिक्षक प्रविण पाटील यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]