नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोढा प्रकल्पात स्थानिक तरुणांना नोकरीला प्राधान्य – आजचा महाराष्ट्र

लोढा प्रकल्पात स्थानिक तरुणांना नोकरीला प्राधान्य

प्रतिनिधी ता सचिन पावशे

रायगड(अलिबाग) :मांडवा, भग आणि धोकावडे येथून नोकरीच्या शोधात शहरात गेलेले तरुण पुन्हा अलीबागकडे वळू लागले आहेत. कारण मांडव्यात सुरु असलेल्या लोढा ग्रुपच्या मोठ्या बांधकाम प्रकल्पात स्थानिक तरुणांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळू लागल्या आहेत.धोकोवडे गावचा ऋषिकेश गावंड सध्या लोढा ग्रुपच्या मानव संसाधन (एचआर) विभागात डेप्युटी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे. वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्याने व्यवस्थापनाचाही अभ्यास केला. त्यानंतर तो ठाण्याला नोकरीसाठी गेला. मात्र लोढा अलीबागमध्ये संधी मिळाल्याचे कळताच त्याने ती लगेच स्वीकारली. ठाण्यात माझ्याकडे चांगली नोकरी होती, पण सतत घरी जाण्याची ओढ वाटायची. आता मला आवडते कामही करता येते आणि कुटुंबासोबत राहण्याची संधीही मिळते, असे ऋषिकेशने सांगितले.अजय म्हात्रे है दूसरे उदाहरण. ते इलेक्ट्रिकल इंजिनीयर असून, आतापर्यंतच्या सगळ्या नोकऱ्या मुंबई आणि नवी मुंबईतच होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लोढामध्ये असिस्टंट साइट इंजिनीयर म्हणून जॉईन केले. माझ्या आधीच्या कंपनीने मला ३० टक्के अधिक पगार देण्याची ऑफर दिली होती. पण मी आईवडिलांसोबत राहण्यासाठी अलीबाग गाठले. आता मला कामही आवडते आणि प्रवासाचा वेळही फारसा लागत नाही,असे त्यांनी सांगितले.सध्या लोढा अलीबाग प्रकल्पात डझनभर कर्मचारी आसपासच्या गावांमधून आलेले आहेत. मुंबईतील एका मोठ्या कंपनीत सात वर्षे काम केल्यानंतर जेव्हा मला माझ्याच गावात लोढामध्ये नोकरी मिळणार असल्याचे कळले, तेव्हा मी फार उत्साही झालो. आता कामही आनंदाने करता येते आणि कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळतो,असे जिग्नेश पाटील यांनी सांगितले. ते सध्या लोढामध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह आहेत.पावसाळ्यानंतर लोढा अधिक अभियंत्यांची भरती करणार असून, स्थानिक तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे. “आम्ही स्थानिक समुदायाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. अलीबाग प्रकल्पासाठी स्थानिक तरुणांचे बायोडेटा मिळावेत म्हणून आम्ही गावांमधील काही नेत्यांशी संपर्क साधला आहे. प्रकल्पात कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तरावर स्थानिकांना नोकऱ्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे.असे लोढा डेव्हलपर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]