नवगाव गावात सप्त्याहाला सुरुवात
प्रतिनिधी ता सचिन पावशे
रायगड (अलिबाग) :- नवेदर नवगाव येथे परंपरेनुसार यंदाही श्रावणातील सोमवारी श्री बोरेश्वर मंदिरात सप्ताह बसला होता. आठवडाभर बोरेश्वर मंदिरात विविध भजन मंडलांच्या भजनांचा मैफिलींचा सप्ताह असतो. नवेदर नवगाव गावातील एकूण सहा भजनी मंडले आहेत. रघुनाथ प्रसादिक भजन मंडळ(वाघे), श्री बोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ(भुंडे), कै.श्री. फुलाजी बुवा गुरुवर्य श्री. बोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ (आगरी /माळी समाज), श्री.हनुमान प्रासादिक भजन मंडळ (भंडारी समाज), श्री.दत्त 
प्रासादिक भजन मंडळ (झुरे), श्री. गजानन प्रासादिक खोलीवाले भजन मंडळ (शास्त्री) अशा सहा भजनी मंडळ दिवस रात्र मंदिरात भजन करत असतात. सोमवार दिनांक २८ जुलै रोजी पहाटे ४ वाजल्यापासून भाविक मंदिरात देवदर्शनासाठी आले होते.सकाळी आठ वाजता सप्त्याहाला सुरुवात झाली.या सप्त्याहाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नवगावकरांसह अन्य परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून बोरेश्वराचे स्तुतिगान केले.सात दिवस सप्ता असतो तसेच मंदिरात आपले नवस फेडण्यासाठी भाविक सात दिवस मंदिरात राहत असतात.त्यानंतर म्हणजे श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी बोरेश्वराची पालखी निघत असते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













